शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :सोलापूर , मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (19:44 IST)

नवरदेवासह दोघांचा मृत्यू

accident
मिळालेल्या माहितीनुसार, मयत दीपक बुचडे याचं 18 जून रोजी लग्न होणार होतं. त्यामुळे त्याची लग्नपत्रिका देवाच्या द्वारी ठेवण्यासाठी तो बुधवारी त्याच्या दोन मित्रांसह अक्कलकोटला निघाला होता.वाटेत त्यांनी तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानी आणि अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं दर्शनही घेतलं. मात्र,गाणगापूरच्या दत्त दिगंबरांचं दर्शन घेण्याअगोदर या तिघांवर काळाने घाला घातला.
 
नवरदेवाच्या कारला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत नवरदेवासह त्याच्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट-दुधनी रस्त्यावरील बिंजगेरच्या दर्ग्याजवळ हा सर्व भीषण प्रकार घडला आहे.
 
 याप्रकरणी दीपक यांच्या नातेवाईकांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.