शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (19:10 IST)

ॲलर्ट : गोदावरीला पूर

सागर शिंदे कार्यकारी अभियंता नाशिक यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे तो 15000 क्युसेक्स पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार असल्याने या SOP प्रमाणे सर्व संबंधित विभागानी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत.
 
नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.
 
 
- सूरज मांढरे, 
जिल्हाधिकारी नाशिक