बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (15:37 IST)

जायकवाडी धरणाचे 18 रेडिअल गेट्स टप्प्याटप्प्याने अर्धा फुट उघडले

मुसळधार पावसामुळे  मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाचे 18 रेडिअल गेट्स टप्प्याटप्प्याने अर्धा फुट उघडून एकूण 9432 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. ही आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. 
 
 जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे तसेच सध्यस्थीतीतदेखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंत एकूण 92.31 टक्के जलसाठा झाला आहे आणि अजून त्यामध्ये भर पडत आहे. प्रकल्पात 100 टक्के जलसाठा झाल्याने आज 18 दरवाजे उघड्ण्यात येत आहेत. जायकवाडी प्रकल्पाच्या खालील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विदुयत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.