शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (14:08 IST)

पुराच्या पाण्यात तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी व्हिडीओ व्हायरल

सध्या अवघ्या महाराष्टाला पावसाने झोडपून काढले आहे.सध्या राज्यातील काही भागात सर्व नद्या आणि धरणे ओसंडून वाहत आहे.सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.नाशिक जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पावसामुळे नदीला पूर आले आहे. गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्ग केल्यामुळे नाशिकतील रामकुंडावर पाणी भरल्यामुळे पोहणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. या ठिकाणी काही तरुण आपला जीव धोक्यात टाकून उंचीवरून उड्या मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे सध्या पावसाचा जोर वाढला आहे. येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होंऊन काही ठिकाणी सतर्कतेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.नागरिकांना आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नदी पात्राजवळ जाऊ नये अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली असून देखील नाशिकात काही तरुण जीवघेणा स्टंट करत आहे.आणि त्यांच्या या स्टंट करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.