बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (15:30 IST)

दुर्देवी !सांगलीत सक्ख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले

Unfortunately
एखाद्याचा काळ कुठून येईल काहीच सांगता येत नाही. सांगलीत आटपाडी तालुक्यातील करगणी मध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील राहणाऱ्या दोन सक्ख्या अल्पवयीन बहिणींचे मृतदेह एका विहिरीत आढळले.ही घटना कळतातच संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

या दोघी संख्या बहिणी दररोज घरापासून लांब वेताळ मंदिराजवळ बंधाऱ्यावरील विहिरीत धुणे अंघोळ करण्यासाठी ये जा करायचा. पाय घसरून त्या विहिरीत पडल्या आणि बुडून त्यांचा दुर्देवी अंत झाल्याची शक्यता प्राथमिक तपासात वर्तवली जात आहे.

सविता मोतीराम पवार(18) आणि संगीता मोतीराम पवार (14)असे या मयत झालेल्या मुलींची नावे आहे.या दोघी आदिवासी समाजातील मु रा.रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रातवड गावाच्या रहिवाशी होत्या. पण सध्या त्या कुटुंबियांसह करगणी परिसरात राहत होत्या. या दोघी सख्ख्या बहिणी होत्या.

दररोज प्रमाणे त्या बंधाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी धुणे करण्यासाठी गेल्या नंतर त्यांचे मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या एका विहिरीत आढळून आले. वैद्यकीय अहवालात त्यांचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला आहे.पोलीस पुढील तपास करत आहे.