शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मार्च 2020 (16:49 IST)

येस बँकेच्या ग्राहकांच्या अडचणी 18 मार्चपासून दूर होणार

येस बँकेच्या ग्राहकांच्या अडचणी 18 मार्च संध्याकाळी 6 वाजेपासून दूर होणार आहेत. अर्थमंत्रालयाने बँकवर असलेला 3 एप्रिल पर्यंतचा मोराटोरियम 18 मार्चला हटवण्यात येईल असं आधीच स्पष्ट केलं आहे. आता येस बँकने देखील ट्विट करत याला दुजोरा दिला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. येस बँकेने म्हटलं की, '18 मार्चपासून संध्याकाळी 6 ला बँकेच्या सर्व सेवा सुरळीतपणे सुरु होणार आहेत.' 
 
19 मार्चपासून ग्राहकांना बँकेच्या सर्व सेवा मिळणार आहेत. 50 हजार रुपयापेक्षा अधिकची रक्कम देखील ग्राहकांना काढता येणार आहे. बँकेने ट्विट करत म्हटलं की, ग्राहक आमच्या 1132 शाखांपैकी कोणत्याही शाखेत निराश होणार नाहीत. याशिवाय डिजिटल सेवा आणि प्लॅटफॉर्म्सवर देखील निराश होणार नाही.