1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (20:37 IST)

राज्यातील सर्व दुकानावरील पाट्या आता मराठीतच ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील दुकानांवरील सर्व पाट्या आता मराठीतच झळकणार आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे  राज्यातील सर्व छोट्या -मोठ्या दुकानांवरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहे. सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात असे नियम राज्यसरकारने केले होते. मात्र काही ठिकाणी या नियमांची अंमलबजावणी केली जात नव्हती. अनेक ठिकाणी दुकानांवरील पाट्या मराठी ऐवजी इंग्रजी मध्ये मोठ्या ठळक अक्षरात दिसत असायचा . मात्र आज राज्य सरकार ने घेतलेल्या निर्णयामुळे पाट्यावर नाव मराठीत आणि मोठ्या अक्षरात ठेवावं लागणार आहे. मराठीत -देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाही. अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.
 
आस्थापनात कामगार संख्या 10 पेक्षा कमी असल्यास किंवा 10 लोकां पेक्षा अधिक आस्थापना असल्यास अशा सर्व आस्थापनेचा मालक नामफलक मराठी देवनागरी लिपी सह इतर भाषेत देखील लिहू शकतील. मात्र मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांपेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत मद्य विक्री केली जाते. त्या आस्थापनेला कोणत्याही महापुरुष किंवा महनीय महिला किंवा गड किल्याची नावे देऊ नयेत. असा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे. 
 
या व्यतिरिक्त  बृहन्मुंबई महानगर पालिका हद्दीतील 500 चौरस फूट पर्यंतच्या निवासी मालमत्तांना   मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे.