बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (21:38 IST)

दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारल्याचा आरोप

deepali sayyad
शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. पाकिस्तानमध्ये दीपाली सय्यद यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा खळबळजनक दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन भाऊसाहेब शिंदे यांनी हे गंभीर आरोप केले.
 
भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात मी दीपाली सय्यदचे अंडरवर्ल्डशी संबंध असणारे अनेक पुरावे प्रशासनाला दिले आहेत, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मी तुम्हाला दीपाली सय्यद यांच्या बँक खात्यांचा तपशील दिला आहे. २०१९ मध्ये दिपाली सय्यद यांना पाकिस्तानचा नकली पासपोर्ट देण्यात आला. त्या पासपोर्टची प्रतही मी तुम्हाला दिली. दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचं राष्ट्रीयत्व स्वीकारलं आहे. पाकिस्तानात त्यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा दावा शिंदे यांनी केला.

दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी आणि त्याच्या बायकोशी संबध आहेत. तसेच लंडन, दुबई येथे त्यांची मालमत्ता आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला.

Edited by : Ratnadeep Ranshoor