1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 31 मे 2021 (07:51 IST)

बायोबबलमध्ये पालखी सोहळ्यास पंढरपूरला नेण्यास परवानगी द्या

शासनाने आयपीएल प्रमाणेच जैव सुरक्षा कवचामध्ये (बायोबबल) श्री संत तुकाराम महाराज ३३६ व्या पालखी सोहळ्यास पंढरपूरला नेण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केली आहे. 
 
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळ्या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच सभा घेतली होती. या सभेमध्ये मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनी मोजक्याच ५०० वारकऱ्यांसमवेत पायी वारीचा आग्रह धरला होता. या सभेत पुढील आढवड्यात या संदर्भात कॅबिनेट मध्ये चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेऊ असे पवार यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने बायोबबलला परवानगी दिल्यास श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्यात येईल असे सांगितले.