1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Amit Thackeray's different prediction, he drove a bullock cart for some time

अमित ठाकरे यांचा वेगळा अंदाज, काही वेळ चालवली बैलगाडी

Amit Thackeray's
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नेत्यांना महापालिका निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावरही मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची जबाबदारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मुंबईतील उत्तर पूर्व मतदार संघातील वॉर्डांची जबाबदारी असणार आहे. मात्र याचदरम्यान अमित ठाकरे यांच्या एका वेगळ्या अंदाजामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. 
 
अमित ठाकरे पुण्यातील खेड तालुक्यातील सावरदरी या ठिकाणी मनसेच्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटनासाठी गेले होते. यादरम्यान अमित ठाकरे यांनी काही वेळ बैलगाडी चालवली. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. तसेच अमित ठाकरेंनी बैलगाडी चालवल्याने उपस्थित असणारे कार्यकर्ते देखील भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. 
पुढील लेख
भाजपकडून द्विस्तरीय शिवगान स्पर्धेचे आयोजन