मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (07:31 IST)

अनोखे : घटस्फोटित, परित्यक्ता आणि अपत्यहीन महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ

सहारा प्रॉडक्शन हाऊस आणि अक्षदा विवाह संस्था यांच्यातर्फे विधवा घटस्फोटित, परित्यक्ता, अपत्यहीन महिलांसाठी विशेष हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ येत्या रविवारी ७ तारखेला धायरी येथे होणार आहे.अक्षदा विवाह संस्थेचे संचालक डॉ राजेंद्र भवाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
 
प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की, अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था ही डॉ. पी. के. भवाळकर यांनी 1945 साली स्थापन केली. कुमारिकांचे विवाह जमवण्याबरोबरच विधवा, विधुर घटस्फोटितांचे, दिव्यांग वधु वरांचे इतकेच नव्हे तर जेष्ठ नागरिकांचे विवाह जुळवण्याचे काम सामाजिक हेतूने सातत्याने चालु आहे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन पण दिले जात आहे. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि अपत्यहीन महिलांसाठी विशेष हळदी कुंकू समारंभ समाजभान ठेवून आयोजित करण्यात आला आहे, असे डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी सांगितले.