शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (07:28 IST)

धनंजय मुंडे यांचे गर्दी करत सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला हवी

मागील काही दिवसांपासून कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचं राज्यात अनेक  ठिकाणी जोरदार स्वागत होत आहे. जेव्हा  धनंजय मुंडे  औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी देखील त्यांचं कार्यकर्त्यानी  जोरदार जंगी  स्वागत केले होते.  त्यांच्या स्वागतासाठी   मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती.  मात्र याचपार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली करत  निशाणा साधला आहे.
 
 काही लोक धनंजय मुंडे यांचे मोठे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करताना दिसत आहेत. पराक्रमी योद्धा असल्याप्रमाणे धनंजय मुंडे हे  त्यांचे स्वागत केले जात आहे. परंतु त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले आहेत याची कबुली त्यांनी स्वतःच दिलेली होती, असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं. तसेच धनंजय मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करणारे आणि मोठमोठे सत्कार करणाऱ्यांची मानसिकता आपल्याला तपासावी लागेल, अशी टीकाही तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्याचप्रमाणे हे असेच सुरु राहिले तर काही काळानंतर बलात्काराचे आरोप असलेल्या नेता आणि मंत्र्यांचे स्वागत करण्याचा चुकीचा पायंडा पडेल, अशी भीती देखील तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे.