1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified बुधवार, 13 जानेवारी 2021 (11:19 IST)

टीम इंडिया आणि सिराजची वॉर्नरने मागितली माफी

सिडनीमध्ये झालेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारताचे मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला. या प्रकारावर सर्व आजी-माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
यामध्येच आता ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर यानेही आपले मत व्यक्त केले आहे. झालेल्या या प्रकाराबद्दल त्याने सामन्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून टीम इंडिया आणि मोहम्मद सिराजची माफी मागितली आहे. तसेच त्याने आपल्या प्रेक्षकांना सुनावले आहे. क्रिकेटमध्ये वर्णद्वेषी टीकेला कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी अशा प्रकारचे कृत्य करु नये, असे आवाहन आपल्या पोस्टमध्ये त्याने केले आहे.