शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (14:02 IST)

अन्न पचत नसल्यास हे योगासन करावे, फायदा होणार

सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपण घेतलेले अन्न व्यवस्थितरीत्या पचत नाही. त्या मुळे पोटात अफरा येणं, गॅस होणं सारखे त्रास उद्भवतात. सतत अनेक दिवसांपर्यंत असणारा हा त्रास बऱ्याच मोठ्या आजाराला कारणीभूत ठरतो. म्हणून महत्त्वाचे आहे की आपल्या दिनचर्येला सुरळीत आणि व्यवस्थित करणे आणि आपल्या दैनंदिनीमध्ये योगाचा समावेश करणे.
 
या योगासनांचा दररोज सराव केल्याने पोटाच्या आणि जेवणाशी निगडित समस्यांना दूर करण्यात मदत होते. चला तर मग या योगासनांबद्दल जाणून घेऊ या. 

हे आसन करण्यापूर्वी आपण याची खात्री बाळगावी की आपल्याला पोटाशी निगडित काही आजार तर नाही. जर कंबर दुखी आणि स्नायूंमध्ये त्रास होत असल्यास, त्यावेळी उत्तान पादासन करू नये. तसेच गरोदर महिलेने देखील हे आसन अजिबात करू नये. 
 
* उत्तानपादासन - 
हा असा योगासन आहे की जे केल्याने पोटाच्या सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. हे केल्यामुळे पोटाची चरबी देखील कमी होते. पोटात होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या त्रासावर हे रामबाण उपाय आहे. उत्तान पादासन केल्याने नाभी यंत्रणा किंवा नाभी मंडळ देखील निरोगी राहतं. तसेच पोटाच्या आंतड्या देखील सुदृढ होतात. हे केल्याने गॅसचा त्रास देखील नाहीसा होतो.
 
* उत्तानपादासन करण्याची पद्धत - 
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर पाठीवर झोपा. आता आपल्या दोन्ही हातांना मांड्यांजवळ ठेवा. लक्षात असू द्या की आपले गुडघे, टाचा आणि अंगठे एकमेकांना लागलेले असावे. नंतर दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या दोन्ही पायांना एकत्ररीत्या वर उचला. जो पर्यंत शक्य असेल श्वास धरून ठेवा, पाय देखील वरचं ठेवा. आता हळुवार श्वास सोडतांना पायांना खाली आणा आणि शरीराला सैल सोडा.