1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अमरावती , सोमवार, 18 एप्रिल 2022 (21:36 IST)

अमरावतीत झेंड्याचा वाद! 23 आरोपी अटकेत; अचलपूर परिसरात तणावपूर्ण शांतता

amrawati
अमरावतीच्या अचलपूर येथे दुल्हागेट परिसरात झेंड्यावरून हिंदू मुस्लिम वाद उफाळून आला. हा वाद पुढे विकोपास गेला आणि दंगल उसळली. अचलपूर परिसरात शांतता राहावी याकरिता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सध्या लावण्यात आला आहे. अचलपूर येथे सध्या तणावपूर्ण शांतता आहे. सध्या अचलपूर व परतवाडा मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
 
झेंड्यावरून हिंदू मुस्लिम गट एकमेकांना भिडल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. दुला गेटवर झेंडा लावण्याचा वाद विकोपास गेल्यानंतर ही घटना घडली. या वादामुळे अमरावती शहरात सध्या जातीय तणाव निर्माण झाला आहे. परिणामी पोलिसांना अचलपूर परिसरात जमावबंदी आणि संचार बंदी लागू करावी लागली आहे. सध्या पोलिसांनी 23 आरोपींना अटक केली आहे. तर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अचानक संचारबंदी लागू केल्यानंतर अचलपूर परिसरात स्मशान शांतता पसरली असून, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.
 
अचलपूर परिसर हा अत्यंत संवेदनशील परिसर समजला जातो. 2007 साली देखील अशीच मोठी दंगल या परिसरात घडली होती. त्यानंतर पुन्हा जातीय तीळ निर्माण झाली असल्याने अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी सर्वाना शांततेचं आवाहन केलं आहे.
 
अचलपूर परिसरात शांतता राहावी याकरिता संचारबंदी लागू केलेली असताना याठिकाणी भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी व निवेदिता चौधरी यांनी अचलपूर शहरात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केल्यानंतर शिवराय कुळकर्णी यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.