गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (15:43 IST)

गर्भवती महिलेचा हुंड्यासाठी छळ, पोटावर बॅग मारल्याने गर्भपात

Amravati Pregnant woman tortured for dowry
अमरावती येथे हुंड्यासाठी छळ करत गर्भवती महिलेच्या पोटावर बॅग मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पांढुरणा भागात घडली आहे. पतीशिवाय सासरच्या चौघा जणांनी पीडित महिलेचा छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
लग्नानंतर दीड महिन्यात हा प्रकार घडला असून धक्कादायक म्हणजे पोटावर बॅग मारल्याने महिलेचा गर्भपात झाल्याचंही समोर आलं आहे. 
 
शेगांव नाका भागात राहणाऱ्या या तरुणीचा विवाह 5 जानेवारीला पांढुरणा येथील युवकासोबत पार पडला. विवाहानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी तिला माहेरुन पैसे आणण्यास तगादा लावला होता. धक्कादायक म्हणजे एकदा पती घरी नसताना दिराने विनयभंग केल्याचंही पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
 
अखेर हुंड्यासाठी छळ करत गर्भवती महिलेच्या पोटावर बॅग मारण्यात आली ज्याने महिलेचा गर्भपात झाला. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह एकूण पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.