शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (15:20 IST)

देवळालीत रनिंग करताना लष्कराच्या जवानाचा मृत्यु

नाशिक येथील आर्मी भागातील देवळाली कॅम्प येथील लष्करी हद्दीत नियमीत रनिंग करीत असतांना पडल्याने लष्कराच्या एका जवानाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
 
हिमांशू शेखर जाना ( ३७ ) असे मृत जवानाचे नाव आहे. जाना हे लष्करात हवालदार पदावर कार्यरत होते.  सकाळी ते लष्करी हद्दीत धावण्याचा नियमीत सराव करीत असतांना ही घटना घडली. धावत असतांना अचानक पडल्याने त्यांना औषधोपचारासाठी मिलट्री हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला.
 
याप्रकरणी मेजर डॉ. विकास कुमार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ठाकरे करीत आहेत.