बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (08:31 IST)

विवाहित प्रेमीयुगुलाची धारदार चायना चाकूने गळा चिरत, पोटात वार करून आत्महत्या

अमरावतीच्या परतवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या येणी पांढरी येथील शेतशिवारात बुधवारी  विवाहीत प्रेमीयुगुलाचे  मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांची आत्महत्या आहे कि हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या कांडली ग्रामपंचायत हद्दीतील वनश्री कॉलनी येथील रहिवासी सुधीर रामदास बोबडे ( 48 ) व एक महिला दोघेही सोमवारी दुपार पासून बेपत्ता होते. त्यांची शोधाशोध सुरू होती. त्यांच्या प्रेमसंबध होते, अशी माहिती आहे. दरम्यान येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतशिवारात दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मिळाले.
 
माहिती मिळताच परतवाडा पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तेथे दोघांचे मोबाईल, पर्स, चायना चाकू व इतर साहित्य आढळले. प्रथमदर्शनी दोघांनी आत्महत्या  केल्याचे निदर्शनास येते. पण, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिलेच्या गळ्यावर व पोटावर तर सुधीर याच्या गळ्यावर चायना चाकूचे वार होते. सुधीर हा कविठा स्टॉप येथे पानटपरीचा व्यवसाय करित होता व त्याला दोन मुले आहेत तर महिलेला एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघेही विवाहित असून त्यांची हत्या की आत्महत्या या चर्चेला पेव फुटले आहे . पोलिस तपासानंतरच या घटनेच्या पाठीमागचे कारण उलगडेल असे पोलिसांनी सांगितले.