बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (07:59 IST)

अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा

शेतकरी आंदोलन या प्रकरणात लोकप्रिय स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर अनेक कलाकारांनी ट्विट केलं. या मुद्यावरून सेलिब्रिटी ट्विट प्रकरणात कलाकारांच्या ट्विटची सरकार चौकशी करणार आहे. या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. 
 
अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, महाराष्ट्र सरकारने कलाकार खास करून भारतरत्न पुरस्कार प्राप्त लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्यांनी फक्त शांत आणि एकत्र राहण्याची विनंती ट्विटमध्ये केली होती. अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि विराट कोहली यांच्या सहीत अन्य सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.