मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2024 (12:41 IST)

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

suicide
राजस्थानची राहणारी एक विद्यार्थिनी मागील डिसेंबर महिन्यापासून ठाण्यामध्ये राहत होती. या विद्यार्थीने ठाण्यामध्ये आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या जोधपूरच्या तरुणाला पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. 
 
महाराष्ट्रातील ठाणे येथे एका 23 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण राजस्थानमधील जोधपूर येथील रहिवासी आहे.   
 
या आरोपीने या विद्यार्थिनीच्या फोटोसोबत छेडछाड करीत तिला ब्लॅकमिल करत होता. यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने स्वतःलाच संपविले. एका अधिकारींनी सांगितले की, पीडिता ही राजस्थानमधील राहणारी आहे. तसेच ती ठाण्यामध्ये भाईंदर परिसरात राहत होती. पंजाब मध्ये आरोपीसोबत तिची मैत्री झाली. जिथे पीडिता फार्मसी कोर्स परीक्षा देण्यासाठी गेली होती. तसेच आरोपी तिला पार्क मध्ये घेऊन गेला व तिच्यासोबत फोटो काढलेत. नंतर आरोपीने तिच्या फोटोसोबत छेडछाड केली. व ब्लॅकमिल करू लागला. यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलले. या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली.