शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (10:06 IST)

दुर्दैवी दोघा भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने, दोघा  सख्ख्या भावांचा  मृत्यू झाला. घटनेमुळे शिरसमार्ग गावावर शोककळा पसरली आहे. विकास सुदाम ठोंबरे (वय २३) आणि गणेश सुदाम ठोंबरे (वय २१) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विकास आणि गणेश दोघेही आपल्या स्वत:च्या शेतातील शेततळे पाहण्याठी गेले होते.

शेततळ्याभवती फिरत असताना अचानक पाय घसरून दोघेही पाण्यात पडले. यावेळी आजुबाजुला परिसरात कोणी नव्हते. त्यामुळे त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मादळमोही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. विकास ठोंबरे याचा वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. तर गणेश हा अविवाहित होता.