शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (16:33 IST)

स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे, नेतानिवडीसाठी नाही - पोस्ट व्हायरल

स्वतःच्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी दाखवू नका, महाराजांच्या नावे मतं मागू नका” अशा शब्दात ‘चला हवा येऊ द्या’ फेम पत्रलेखक आणि कवी अरविंद जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीकाच केली आहे. 
 
गुजराथ हे स्वस्तातल्या साडीसाठी ठीक आहे मात्र नेता निवडीसाठी नाही असे जगताप यांनी म्हटले आहे. त्यांच्या पोस्टला जोरदार प्रतिसाद मिळत असून, चर्चेचा विषय झाला आहे. तर अनेक नेटकऱ्यानी यावर आपले मत सुद्धा व्यक्त केले आहे. 
 
काय आहे पोस्ट?
“गुजरातचे त्याकाळचे सत्ताधारी लोक एक मराठी राजा येईल म्हणून घाबरायचे. त्या मराठी राजांचं नाव होतं शिवाजी महाराज. आता महाराष्ट्र कुणाची वाट पाहतो? कधी अहमद पटेल. कधी अमित शहा. आघाडी आणि यूतीत धमक नाही. स्वत:च्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी नका दाखवू. पुन्हा कधीच महाराजांच्या नावाने मत मागू नका. स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे. नेतानिवडीसाठी नाही.”
 
या पोस्ट वर आलेल्या अनेक प्रतिक्रिया पैकी एक प्रतिक्रिया : 
 
हेमंतकुमार शितोदे देशमुख यांची प्रतिक्रिया 
जगताप सर नमस्कार तुमची पोस्ट वाचली आणि मनात एक प्रश्न निर्माण झाला की तुम्हाला माहीत आहे का नाही आपला देश स्वतंत्र झाला आहे .....
कारण ज्या काळी गुजरातचे लोक छत्रपती शिवाजी महाराजनां घाबरायचे तो काळ स्वातंत्र्य पूर्व काळ होता तेव्हा तिथे भारतीय नाही तर यवन लोक राहत असत ...अत्ता तिथे गुजराती लोक आहेत खरं पण ते भारतीय आहेत हे पण लक्षात असू द्या ......
आणि हो तुम्ही म्हंटलात ना जी गुजराती स्वस्त साडी पुरता ठीक आहे नेता निवडीसाठी नको तर एका अरविंद सर.... आज त्याच गुजरातच्या महान नेत्याची जयंती आहे ज्याने 567 च्या आसपास संस्थाने खालसा करून हा भारत देश एक केला ....
गुजराती,युपी,बिहार हा प्रांतवाद सोडा भारतीय म्हणून एक व्हा......जय हिंद जय महाराष्ट्र