सोमवार, 8 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (13:59 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात अज्ञात कार शिरली

An unidentified car entered the convoy of Chief Minister Uddhav Thackeray Maharashtra News Mumbai News In Marathi Webdunia Marathi
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात एक आलिशान मर्सिडीज कार शिरल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी मुंबईत घडली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सायंकाळी गृहविभागाची बैठक संपवून आपल्या घराकडे निघताना एक अज्ञात कार त्यांच्या ताफ्याच्या मध्ये शिरली.कारचालक वेगाने ही कार चालवत होता.

स्थानिक पोलिसांनी आणि वाहतूक पोलिसांनी त्याला थांबविले आणि चौकशी केली.त्यात तो इसम व्यापारी असून मुंबईतच राहतो.असे समजले.तो जिम मधून आपल्या घरी जात होता.
 
पोलिसांनी त्याचा विरोधात वेगाने आणि निष्काळजीपणाने गाडी चालवण्यासाठी भादंविच्या कलम 279 आणि मोटार वाहन कायद्याचा कलम 179 आणि 177 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या व्यापारी भरवेगाने सुसाट कार पळवत होता. कानात इयरफोन लावले असल्यामुळे त्याला भान नव्हता की गाडी कोणत्या दिशेने जात आहे.पोलिसांनी त्याला जामीन देऊन त्याला सोडले आहे.