गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (15:38 IST)

फडणवीस यांच्यावर आणखीन एक जबाबदारी

devendra fadnavis
भाजपने संसदीय समिती आणि निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे. भाजपच्या नव्या निवडणूक प्रचार समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे.
 
तर निवडणूक प्रचार समिती आणि संसदीय समितीतून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी  आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना डच्चू देण्यात आला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनाही या संसदीय समितीत घेण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे संसदीय समिती आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष असणार आहे. संसदीय समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा राहणार आहेत. भाजपची ही संसदीय समिती एकूण 11 सदस्यांची आहे. या समितीतून दोन नेत्यांना वगळण्यात आलं आहे. तर तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.