शनिवार, 14 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (11:13 IST)

मनोज जरांगे पाटीलांच्या दौऱ्यात आप्पासाहेब कुढेकर यांचा अपघात

मनोज जरांगे पाटीलांचा दौरा सध्या त्र्यंबकेश्वरला आहे. मराठा समाजाच्या बांधवानी या वेळी गर्दी केली असून गर्दीला बाजू करताना मनोज जरांगे पाटीलांचे सहकारी आप्पासाहेब कुढेकर यांच्या डाव्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीनं त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना अधिक उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
मनोज जरांगे पाटीलांची सभा नाशिक मध्ये होती. जरांगे यांचे सहकारी अप्पासाहेब कुढेकर हे नेहमी त्यांच्यासोबत असतात. सभेसाठी जात असताना त्यांचा ताफा त्र्यंबकेश्वरला पोहोचला असताना गर्दीला बाजू करताना अप्पासाहेब कुढेकर यांच्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
त्यांना नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मनोज जरांगे पाटीलांनी सभेनंतर कुढेकरांची भेट घेतली. सभांना गर्दी करा पण कोणालाही इजा होऊ देऊ नका असे आवाहन मनोज जरांगे पाटीलांनी केले आहे. 
 











Edited by - Priya Dixit