मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (07:58 IST)

शिंदे गटाकडून नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदी यांची नियुक्ती

जिल्हाप्रमुख,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आणि महानगर प्रमुख यांच्या पाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखपदी ठाणे येथील संजय बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय बच्छाव हे गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी करतच होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी आज त्यांची नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखपदी अधिकृतपणे नियुक्ती केली आहे. उत्तम संघटन कौशल्य असलेल्या संजय बच्छाव यांची संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्याने शिवसेना वर्तुळात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पक्ष बांधणीच्या कामाला वेग आला आहे.मागील आठवड्यात शिवसेनेचे जिल्हाध्यक्षपदी अनिल ढिकले आणि दिंडोरी ग्रामिणच्या जिल्हाध्यक्षपदी भाऊलाल तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्या पाठोपाठ कालच महानगरप्रमुखपदी नगरसेवक प्रविण तिदमे,शहरी युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी योगेश म्हस्के आणि महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी लक्ष्मीबाई ताठे यांची नियुक्ती करण्यात आली आले.पक्षाची बांधणी अधिक वेगाने व्हावा यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी संजय बच्छाव यांची नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. संजय बच्छाव यांच्या निवडीचे नामदार दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे,आमदार सुहास कांदे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले,महानगरप्रमुख प्रविण तिदमे आदी मान्यवरांसह शिवसैनिकांनी स्वागत केले आहे.