सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (21:03 IST)

नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयात ७५ फुटांवर तिरंगा फडकणार

flag
देशात ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष’ साजरे केले जात असून त्याचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयांच्या आवारात ७५ फुटांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे. आधी जिल्ह्यात फक्त पाच ठिकाणी ध्वज उभारणीच्या कामाची जोरदार तयारी केली जात होती. मात्र सर्वच तहसीलदारांकडून या उपक्रमासाठी मागणी होऊ लागल्याने आता प्रत्येक तहसीलच्या परिसरात ७५ फुटापर्यंत ध्वज उभारण्यात येणार आहे.
 
यंदाचे वर्ष खास आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव’साठी सरकारी यंत्रणांची तयारी जोरदार सुरु असून जिल्हा प्रशासननेही कंबर कसली आहे. अनेक उपक्रम राबवणे सोबतच त्यांच्या सर्व उपाययोजना तसेच घरोघरी ध्वज उभारण्यासोबतच त्याचा सन्मान राखणे यासर्वासाठी जनजागृती केली जात आहे.
 
जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयांच्या आवारात ७५ फुटांवर तिरंगा या उपक्रमासाठी जिल्हा नियोजनाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून या उपक्रमासाठी तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून यात प्रत्येक तहसीलच्या आवारात ध्वजस्तंभ आणि संविधान स्तंभ उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. या उपक्रमाला जवळपास २० लाख रुपये खर्च होण्याची शक्यता असून येत्या १३ तारखेपर्यंत सर्वच ठिकाणी कामकाज पूर्ण करण्याचा सूचना जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी दिल्या आहेत.
 
त्यामुळे यंदाचे वर्ष हे अविस्मरणीय ठरणार आहे. या उपक्रमांना जनतेकडूनही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून प्रत्येक उपक्रमात जनता नोंदवत आहे. जिल्ह्यातील शाळांमधून, महविद्यालयामधून ‘हर घर तिरंगा’ लावणे सोबतच तो फडकावणे ह्या मोहिमेसाठी जनजागृती केली जात आहे.