शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (08:18 IST)

नाशिक जिल्ह्याचा पाणीसाठा ७३ टक्क्यांवर

मुसळधार पावसामुळे नाशिकमधील धरण हाऊसफुल्ल झाले आहेत. भावली, वालदेवी, आळंदी, ओझरखेड, वाघाड, तिसगाव, हरणबारी आणि केळझर या ८ धरणांची जवळपास शंभरचा आकडा गाठला आहे. तर गंगापूर, दारणा , मुकणे, पालखेड, पुणेगाव धरण जवळजवळ ६५ टक्के भरल्याने जिल्ह्यातील पाणीसाठा ७३ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील काही धरणांतून सलग पाचव्या दिवशी देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी, दारणा आणि कादवा नद्यांचा पूर कायम असल्याचे चित्र आहे. अशात पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कायम आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ सुरू राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो. आधीच नद्यांना आलेल्या पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरू आहे. त्यासोबतच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा
 
गंगापूर धरणसमूह
गंगापूर-६२%
कश्यपी-६८%
गौतमी गोदावरी-८१%
आळंदी-१००%
 
पालखेड धरण समूह
पालखेड-४९%
करंजवण-८१%
वाघाड-१००%
दारणा-६६%
भावली-१००%
मुकणे-७३%
वालदेवी-९४%
कडवा-७०%
ओझरखेड-१००%
पुणेगाव-८१%
तिसगाव-१००%
वालदेवी-९४%
भोजापुर-८०%
 
गिरणा खोरे धरण समूह
गिरणा – ८६%
चणकापूर – ५०%
हरणबारी – १००%
केळझर – १००%
पुनद – ४९%
 
धरणातील पाण्याचा विसर्ग
 
गंगापूर – ७१२८ क्युसेक
आळंदी – ६८७ क्युसेक
पालखेड – ७९५० क्युसेक
करंजवण – १३५२ क्युसेक
वाघाड – २७४५ क्युसेक
ओझरखेड – १९८० क्युसेक
पुणेगाव – ६५३ क्युसेक
तिसगाव – ४० क्युसेक
दारणा – १०,६७० क्युसेक
भावली – ७०१ क्युसेक
कडवा – ३२३३ क्युसेक
चणकापूर – ३६१४ क्युसेक
हरणबारी – २१०४ क्युसेक
केळझर – ८३९ क्युसेक