सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (23:29 IST)

सुनेच्या आत्महत्या प्रकरणी आळंदीच्या माजी नगराध्यक्षांना पती आणि मुलासह अटक

arrest
आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरेगर त्यांचे पती अशोक उमरेगर आणि मुलगा अभिषेक उमरेगर यांना अटक करण्यात आली. वैजयंता उमरेगर यांच्या सुनेने प्रियांकाने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची आत्महत्या नसून तिचा खून केल्याचे आरोप प्रियांकाच्या वडिलांनी अनिल घोलप यांनी केले असून आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रियांकाचे लग्न आठ महिन्यापूर्वी ,माजी नगराध्यक्ष वैजयंती उमरेगर यांचे पुत्र अभिषेक उमरेगर यांच्याशी झाले असून लग्नानंतर सासरच्या मंडळींनी मुलीचा राहिलेला हुंडा म्हणजे संसारोपयोगी साहित्य व फर्निचर आणण्याबाबत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली. सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे  म्हटले आहे. प्रियांका ने रविवारी राहत्या घरात आत्महत्या केली. तिचे शवविच्छेदन करण्यात आले असून तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. 
या प्रकरणी माजी नगराध्यक्ष वैजयंता उमरेगर त्यांचे पती अशोक उमरेगर आणि मुलगा अभिषेक उमरेगर यांना अटक करण्यात आली आहे.