शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 8 मे 2022 (15:01 IST)

Ashadhi Wari : आषाढी वारीची घोषणा

vitthal
Ashadhi Wari 2022 Pandharpur : कोरोनामुळं गेली दोन वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आलं नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला. मात्र परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षाचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. गावागावात वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता या सर्वांना संत तुकोबा आणि संत ज्ञानोबांच्या पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागलेली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहू संस्थांनने या सोहळ्याची आज घोषणा केली आहे. त्यामुळे वारकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. यंदा ही पालखी पुणे आणि इंदापूर मध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे. दोन वर्षे कोरोनामुळं पायी वारीत खंड पडला होता. आता आषाढी वारीची घोषणा झाल्यामुळं वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.