मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: हिंगोली , शुक्रवार, 12 मार्च 2021 (10:56 IST)

जनसुविधा योजनेअंतर्गत ३५० पैकी फक्त नव्वद प्रस्तावांना मंजुरी

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे की जनसुविधा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांच्या विकास कामांची यादी, जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना सोपवण्यात आली होती. त्यापैकी फक्त ९० गावांना पालकमंत्र्यांना कडून मंजुरी देण्यात आल्यामुळे सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
 
जिल्ह्यातील नियोजन समितीअंतर्गत स्मशानभूमी गावातील विद्युत दिवे, गावातील सुशोभीकरण सहित इतर केल्या जाणाऱ्या विकास कामांना पालकमंत्री गायकवाड यांच्या कडून मंजुरी देण्यात आली. एकूण ३५० प्रस्तावांपैकी फक्त ९० प्रस्तांवाना मंजुरी देत, प्रत्येक गावाला पाच लाख रुपय असा निधी देण्यात आला. या निधीचा वापर गावाच्या विकासासाठी करण्यात येईल.
 
कुठे किती कामे
हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त २३ कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापाठोपाठ वसमत तालुक्यात २०, कळमनुरी तालुक्यात १९, औंढा व सेनगावात प्रत्येकी १४ कामे मंजूर करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात या कामांमुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. कोरोना नंतर विकास कामांना पुन्हा गती मिळाली आहे. या गतीला आणखी वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.