1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:42 IST)

शेती उपयोगी साहित्य चोरणारा अटकेत

Arrested for stealing agricultural inputs Maharashtra News Regional Marathi News In Marathi  Webdunia News
जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील एमआयडीसीतून साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे.अरविंद उर्फ आरो अरूण वाघोदे (वय-२५ रा. सुप्रिम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत असे की, मन्यारखेडा शिवारात एमआयडीसी भागातून शेतीसाठी लागणारे साहित्य तयार करण्याची कंपनीतून कामाचे वस्तू ६ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१ दरम्यान चोरीस गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अरविंद उर्फ आरो अरूण वाघोदे याला आज बुधवारी राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळून ७ हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे.पुढील कारवाईसाठी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.