शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (11:56 IST)

आर्यन खानला अटक झालेल्या क्रुझवर आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया पार्टी करत होता - नवाब मलिक

कॉर्डिलीया क्रुझवर कुठलीही छापेमारी झालेली नाही, काही लोकांना ठरवून फ्रेम केलं गेलं, त्यांचे फोटो पाहून त्यांना अटक करण्यात आली. प्रत्यक्ष क्रुझवरील कुणालाही अटक झाली नाही, असा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
 
"या क्रुझवर त्या दिवशी रेव्ह पार्टी झाली. त्यात एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया उपस्थित होता. त्याची मैत्रीण तिथं उपस्थित होती. हा ड्रग माफिया समीर वानखेडे यांचा मित्र आहे," असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
 
या पार्टीचे व्हीडिओ आपल्याकडे असल्याचा दावासुद्धा त्यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारकडे क्रुझ पार्टीची कोणतीही परवानगी घेतली गेली नव्हती, असंही मलिक यांनी म्हटलंय.
 
प्रभाकर साईल यांचे सीडीआर तपासले जावेत. तसंच या प्रकरणात इलेक्ट्रीकल तपासणी झाली पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
समीर वानखडे यांनी खोटी कागदपत्र बनवली आहेत आणि त्या आधारावर नोकरी मिळवली. त्यामुळे त्यांची नोकरी जाईल.
 
नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा आज ट्वीट केला आहे. त्यांनी हे लग्न करण्यासाठी धर्मांतरण केल्याचं यावरून स्पष्ट होतंय, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
क्रुझवर रेव्ह पार्टी झाली तर त्या पार्टीतल्या 1300 लोकांची झाडाझडती का झाली नाही, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.
 
जेव्हा माझ्या जावयाला अटक झाली होती. तेव्हा मी म्हटलं होतं की, कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही. आता माझ्या जावयाला निर्दोष सोडलं गेलय त्याची ऑर्डर ऑनलाईन आहे. माझ्या जावयाला फसवलं गेल. साडे आठ महिने त्याला जेलमध्ये ठेवलं, असंसुद्धा मलिक यांनी म्हटलंय.