बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (11:05 IST)

बंगळुरू महामार्गावर साताऱ्यात टोल भरण्याच्या वादावरून मारहाण

Beaten over a dispute over toll collection in Satara on the Bangalore Highway Maharashtra News Regional Marathi News टोल भरण्याच्या वादावरून मारहाण  News In Marathi Webdunia Marathi
बंगळुरू महामार्गावर कराड जवळील तासवडे टोलनाक्यावर टोल भरण्यावरून वाद झाला त्यात 12 ते 15 जणांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना रात्री घडली. 
एका ट्रॅव्हल्सच्या टोलभरण्यावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. वादाचे कारण फॉस्टग स्कॅनिंग करत नसल्याचे सांगितले जात आहे. काही लोक ट्रॅव्हल्स ने कोल्हापुरातून एका समारंभातून पुण्याच्या दिशेने निघाले असताना बंगळुरू महामार्गावर कराड जवळील तासवडे टोल नाक्यावर टोल भरण्याबाबत हा विवाद झाला. काही लोकांनी सहा जणांना लाथाबुक्याने मारहाणी आणि शिवीगाळ कण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची तक्रार तळबीड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहे.