विरोधी पक्षनेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही
पहिल्या टप्प्याच साधारणत: १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे. मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही”, असे ते म्हणाले.
“विधानसभेच्या विरोधीपक्ष नेता या नात्याने मला आज पत्र मिळाले आहे. उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी विरोधीपक्षांची नावे देण्यासाठी हे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्यामुळे उद्या या समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच विविध चॅनलच्या माध्यमातून मला मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत माहिती मिळाली आहे. मात्र, विरोधीपक्ष नेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही”, अशी माहिती राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे.