शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 6 जून 2021 (10:07 IST)

तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल - उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी लवकरच कोसळणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी'दृष्टी आणि कोन' या कार्यक्रमात त्यांना उत्तर दिलं.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, "जशी युती टिकली तशी आघाडी टिकेल. तीन पक्ष एकत्र आले आहेत. तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल."
"युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी असेल, कामं होत असतील तर ती का टिकू नये? आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही. पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
 
यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप-शिवसेना युतीवरही भाष्य केलं. भाजप-सेना एकत्र येणार का, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, "हे दोन्ही पक्ष वेगळे का झाले, यात त्याचं उत्तर आहे