शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (09:30 IST)

राज्यात तब्बल २२५० नवे कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात एकीकडे लॉकडाऊन शिथील केला जात असतानाच कोरोनाचे रुग्ण काही कमी होत नाही. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल २२५० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर ६५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३९ हजार २९७ झाला असून मृतांचा आकडा १३९०वर गेला आहे. विशेष म्हणजे आजही यातले सर्वाधिक बाधित रुग्ण मुंबई आणि एमएमआर विभागात सापडले आहेत. याशिवाय गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आता राज्यातल्या एकूण डिस्चार्ज घेतलेल्या रुग्णांचा आकडा १० हजार ३१८ झाला आहे.
 
मृत्यू झालेल्यापैकी ४६ पुरूष असून १९ महिला आहेत. यात ३२ रुग्ण ६० वर्षे वयापेक्षा जास्त आहेत. ३१ रुग्ण ४० ते ६० वयोगटातले तर २ जण ४० वयाच्या खालचे आहेत. यातल्या ७४ टक्के अर्थात ४८ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग अशा स्वरूपाचे आजार होते. यामध्ये मुंबईत ४१, पुण्यात १३, नवी मुंबईत ३, पिंपरी चिंचवडमध्ये २, सोलापुरात २, उल्हासनगरमध्ये २ तर औरंगाबाद शहरात २ जणांचा मृत्यू झाला आहे.