रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (16:07 IST)

'म्हणून' असिस्टंट लोको पायलटच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांचे आभार मानले

मुंबईतील असिस्टंट लोको पायलट यांचे शिष्टमंडळ आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे वाहतूक सेनेच्या नेत्यांसह शिष्टमंडळ राज यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले. 
 
रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट ३०० जागांसाठी भरती घेण्यात आली होती.  त्यापैकी १५० नवनियुक्त कर्मचाऱ्यांना रेल्वेने सेवेत रुजू केले आहे. या भरती प्रक्रियेत अडचणी येत होत्या परंतू या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेण्यासाठी मनसेच्या रेल्वे संघटनेने प्रयत्न केला. 
 
रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदासाठी घेतलेल्या भरतीत १५० उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने न्याय मिळवून दिला आहे. या १५० नवनियुक्त असिस्टंट लोको पायलट कर्मचाऱ्यांनी  राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आणि आभार मानले.