शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (16:02 IST)

अवघ्या २० मिनिटातच किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीतून पडले बाहेर

मुंबईहून निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोर्लई ग्रामपंचायतीत पोहोचले. त्यानंतर ग्रामपंचायतीत माहिती घेण्यासाठी ते कार्यालयात गेले. पण त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही कार्यालयात गेल्याने शिवसैनिकांनी आक्षेप घेतला. किरीट सोमय्यांसोबत कार्यकर्ते असल्यामुळे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणता घोषणाबाजी केली. पण शिवसैनिकांनी आक्षेप घेतल्यानेच ग्रामपंचायत कार्यालयातून भाजप कार्यकर्त्यांना बाहेर काढले. अवघ्या २० मिनिटातच किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीतून बाहेर पडले. 
 
किरीट सोमय्यांनी १८ बंगले गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीकडून माहिती घेण्यासाठी हा दौरा केला. याआधी संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना बंगले कुठे आहेत ? असे आव्हान पत्रकार परिषद घेऊन दिले होते.
 
कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यानेच किरीट सोमय्यांना आटोपते घ्यावे लागले. कोर्लई ग्रामपंचायतीच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून स्वच्छताही करण्यात आले. दोन्ही पक्षाचे मोठ्या प्रमाणात दाखल झालेले कार्यकर्ते पाहता अलिबाग पोलिसांकडून याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता पोलिसांनीच सोमय्यांना आटोपते घ्यायला सांगितले.
 
किरीट सोमय्या कोर्लई गावात दाखल होणार असल्याने मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. कार्यकर्त्यांना जाणून बुझून घेऊन किरीट सोमय्या आल्याचे आरोप शिवसैनिकांनी केला. याठिकाणी भाजप आणि शिवसेना या दोन्ही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली. पण वाढती तणावाची परिस्थिती पाहता किरीट सोमय्या यांनी काढता पाय घेतला.