Festival Posters
✕

देशाचा विकासासाठी काँग्रेस सत्तेत येणे गरजेचे - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

Updated: शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (08:44 IST)
 
भाजप निवडणुकीत सांगतात आमच्याकडे या. पैसे घ्या. उमेदवारी घ्या. अन्यथा तुमची फाईल तयार आहे. त्याला बळी न पडणारे फार थोडे आहेत. नगरला केडगावमध्ये आमदार कर्डिलेंमार्फत तोच प्रयोग करण्यात आला आहे. प्रचंड पैशाचा वापर भाजप करते आणि मंत्री गिरीश महाजन त्याचे मॅनेजमेंट करतात. त्यांच्याकडे तेव्हढेच काम आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.
 
'कृषीथॉन' प्रदर्शनाच्या निमित्ताने झालेल्या वार्तालापात ते बोलत होते. नगर महापालिका निवडणुकीत केडगावला पहाटे चारला आमदार कर्डिले यांनी काँग्रेसच्या पाच जणांना फोन केला. तुमच्या विरोधात असे गुन्हे आहेत. त्याची फाईल तयार आहे. त्यामुळे पैसे घ्या, भाजपची उमेदवारी घ्या अन्‌ निवडणुक लढा. अन्यथा कारवाई होईल असे धमकावले. ते उमेदवार भाजपमध्ये गेले आहेत भाजपा दबावाचे राजकारण करत आहे.
 
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पस्तीस हजार कोटींचे बजेट ठेवले आहे. प्रत्येक उमेदवाराला किमान दहा कोटी जरी दिले तरी काय होईल? हे मोठे दुर्देव आहे असे चव्हाण यांनी सांगितले आहे. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा: खत अनुदानासाठी ६२,३७० कोटी रुपयांची तरतूद

कोकणातील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग मानांकन; महाराष्ट्राच्या पर्यटनाला मोठी संधी

परदेशी विमाने मुंबईतूनच उडणार! नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप; केंद्राला धाडले पत्र

LIVE: मुंबईतील विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर हलवली जाणार नाही! मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राला पत्र लिहून मागणी

मुंबईत माणुसकीला काळीमा! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पुढील लेख
Show comments