गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (16:31 IST)

दोन अल्पवयीन मुलींची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

मुंबईतील गोरेगावमधील आरे कॉलनीत दोन अल्पवयीन मुलींनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. दोन्ही मुली या १७ वर्षांच्या असून त्या शाळेत शिकत होत्या. प्रेमभंगामुळे या दोघींनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
 
अनिता पाड्यात राहणाऱ्या १७ वर्षांच्या दोन मुली या चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघींनी मंगळवारी संध्याकाळी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी दोघींनी मोबाईलवर सेल्फी काढला आणि तो मित्रमैत्रिणींना पाठवला. यातील एकीने विहिरीलगत काढलेला सेल्फी भावालाही पाठवला होता. ‘आम्ही आत्महत्या करत आहोत’, असा मेसेजही त्यांनी फोटो पाठवताना केला होता, असे समजते. हा प्रकार समजताच स्थानिकांनी त्यांना बाहेर काढले. दोघींना तातडीने सिद्घार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघींचाही मृत्यू झाला होता.