बाबाची बाबागिरी नवरा शोडतो म्हणून महिलेला लाखोना फसवले
अडाणी आणि शिक्षित दोघेही बुवा बाजीला बळी पडतात हे आता उघड झाले आहे. फकीर भोंदू बाबांनी फसवल्याच्या अनेक तक्रारी आणि प्रकरणं आपण रोज ऐकतो. अशा घटना समाज प्रबोधन होऊन थांबत नाहीत. अगदी ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागांमध्येही असे प्रकार राज रोस घडत आहेत. मुंबई येथील उच्चवस्तित पवईमध्ये नुकताच असा प्रकार उघड झाला आहे. महीलेच्या बेपत्ता झालेल्या पतीला परत आणतो असं सांगत एका भोंदू फकीराने विवाहितेला लाखोंचा चुना लावला आहे. हात चलाखी करत तिचे सर्व दागिने घेऊन हा भोंदू फकीर फरार झाला आहे. सुनीता लोदी असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. सीसीटीव्हीमध्ये या फकिराचा चेहरा कैद झाला असून त्या आधारावर पोलीस तपास करत आहेत. मात्र अश्या गोष्टींवर नागरिक विश्वास कसे ठेवतात असा प्रश्न समोर येतो आहे. या बाबाने क्लुप्त्या करत महिलेला विश्वास्त घेतले आणि तिचे दागिने हात चलाखीने जमा करत त्याने पोबारा केला आहे.