1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. teacher

म्हणून प्राध्यापकाने आपली शिक्षणाची प्रमाणपत्रे जाळली

teacher
पुण्यातल्या वारजे येथील सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये काम करत असलेल्या सूजर बाळासाहेब माळी या प्राध्यापकाने आपली अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षणाची प्रमाणपत्रे जाळली आहेत. थकलेले वेतन मागितले म्हणून संस्थेने नोकरीवरुन कमी केल्याची नोटीस दिल्याने संतप्त झालेल्या प्राध्यापकाने हे कृत्य केले. जवळपास वर्षभराचे वेतन मिळालेले नाही. घरी आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगा असे कुटुंब आहे. मात्र, वेतन मिळत नसल्याने आर्थिक, मानसिक ओढाताण होत आहे. थकलेले वेतन मागितले म्हणून संस्थेने नोकरीवरुन कमी केल्याची नोटीस दिली.
पुढील लेख
जोगेंद्र कवाडे २६ नोव्हेंबरपासून लाँग मार्च काढणार