शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (14:54 IST)

अवनीचे बछडे अखेर शिकारी केली घोड्याची शिकार

यवतमाळ येथील नरभक्षक ठरवत मारलेली अवनी वाघिणीच्या बछड्यांनी घोड्याची शिकार केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील आंजी शिवारात उघडकीस आली. तेजनी-आंजी शिवारातील सेक्टर ६५३ मध्ये ही घटना घडली आहे. अवणी वाघिणीच्या मृत्युनंतर वनविभागाने तिच्या बछड्यांची उपासमार होऊ नये म्हणून आंजी शिवारातील जंगलात घोडा बांधून ठेवला होता. त्याची शिकार झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. वन विभागाने या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यामुळे वाघिणीची दोन बछडे शिकार करू लागल्याचे सिद्ध झाले. परिणामी त्यांच्या उपासमारीचा प्रश्न मिटल्याचे मानले जाते आहे. मात्र अजूनतरी त्यांनी जंगलातील प्राणी मारला नाही त्यामुळे अजूनही त्यांच्यावर लक्ष देण्याचे काम वन विभागाला करावे लागणार आहे.