गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (17:30 IST)

जोगेंद्र कवाडे २६ नोव्हेंबरपासून लाँग मार्च काढणार

jodendra kavade
केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारमधील मंत्री आणि नेते संविधान हटवण्याची मागणी करत आहेत. त्यामुळेच संविधान हा देशाचा गौरव असल्याची जाणीव करून देण्यासाठी भीमा कोरेगाव-भीमा ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढण्याची घोषणा पीपल्स रिपल्बिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी आज केली. या लाँग मार्चला २६ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, तर ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर हा मोर्चा धडकणार आहे. 
 
''भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर, रिपाइं (ए) चे अध्यक्ष व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना संविधानाचा आदर असेल, तर त्यांनी या मार्चमध्ये सामील व्हावे, ''असे आवाहन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे.