मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (12:23 IST)

कुख्यात आरोपीची गुप्तांगावर जबर मारहाण करून तसेच डोके ठेचून हत्या

पुण्याच्या राजगुरूनगरच्या जेलमधून गेल्या महिन्यात पळलेला कुख्यात आरोपी राहुल गोयकर याची बुधवारी रात्री हत्या झाली. गावातील जुन्या भांडणावरून काही जणांनी लाकडी दांडक्याने त्याला चोपले. डोके, गळा आणि गुप्तांगावर जबर मारहाण करून तसेच डोके ठेचून हत्या केली आहे. 
 
कर्जत तालुक्यात खंडाळा येथे राहणाऱ्या राहुल गोयकर याच्यावर शेकडो गुन्हे दाखल होते. त्यात मागील महिन्यात तो जेलमधून फरार झाला होता.  या हत्येप्रकरणी भाऊसाहेब बबन खंडेकर, बबन किसन खंडेकर, हौसराव गोयकर, संतोष गोयकर, राजेंद्र चौधरी, आणि तीन महिलांवर आरोप करण्यात येत आहे.