सिद्धिविनायक मंदिर देवस्थानाला केंद्रीय गृह मंत्रालयकडून नोटीस
सिद्धिविनायक मंदिर देवस्थानाला देशातूनच नाही तर परदेशातूनही निधी मिळतो. परंतु विदेशांतून मिळालेल्या निधीचा तपशील न दिल्यामुळे सिद्धीविनायक मंदिराला केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे देशातील तब्बल १ हजार ७७५ देवस्थानांना या संदर्भात नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराखेरीज मद्रास ख्रिश्चन कॉलेज, स्कोडा ऑटो इंडिया व राजस्थान विद्यापीठ या संस्थांनी देखील नोटीसा पाठविल्या आहेत. विदेशांतून मिळणाऱ्या निधीचा तपशील १ डिसेंबरपर्यंत विवरणपत्र सादर करणे अनिवार्य असते. असे केले नाही तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. यंदा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नोटिसकडे दुर्लक्ष केल्यास या सर्व संस्थावर विदेशी नियमन कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्रालयाने या संस्थाना बजावले आहे.