1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (15:41 IST)

कोविड सेंटरमध्ये रूग्णाने केली डॉक्टरला मारहाण

At the Covid Center
अलिबागच्या कोविड सेंटरमध्ये रूग्णानेच डॉक्टरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉ. स्वप्नदीप थळे असं त्यांचं नाव असून ते गंभीर जखमी झाले आहे.डॉ. थळे यांच्यावर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
 
रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास डॉ.स्वप्नदीप थळे हे कोविड सेंटरमध्ये राऊंडसाठी गेले होते.यावेळी एका रुग्णाने सलाईनचा स्टँड त्यांच्या डोक्यात घातला.दरम्यान या रूग्णाने डॉक्टरांना का मारहाण केलीये मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.या मारहाणीमध्ये डॉ. थळे यांच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
 
याबाबत महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, डॉक्टर मारहाणीसाठी असलेल्या कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हायला पाहिजे.या कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली की लोकं याबाबत जागृत होतील.याअंतर्गत होणाऱ्या शिक्षेची त्यांना जाण होईल.आणि यामुळे डॉक्टरांवर होणारे हल्ले कमी होण्यास मदत होईल.त्याचप्रमाणे हा कायदा सेंट्रल लॉमध्ये आणावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आयएमएकडून केली जातेय."