शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (21:10 IST)

आठवले यांच्या पक्षाला मिळाले निवडणुकीसाठी 'हे' चिन्ह

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षही त्यासाठी सज्ज झाला आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आठवले यांच्या पक्षाला चिन्ह देखील दिलं आहे. निवडणूक आयोगाने आठवले यांच्या पक्षाला चार राज्यांसाठी कपबशी तर एका राज्यासाठी हेलिकॉप्ट चिन्ह दिलं आहे .
 
आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला पुदूचेरी, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ या चार राज्यांमध्ये कपबशी हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर तामिळनाडूसाठी हेलिकॉप्टर हे चिन्ह देण्यात आलं आहे.