शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (08:17 IST)

औरंगाबाद : आर्थिक अडचणीत सापडलेल्या नामांकित बांधकाम व्यावसायिकची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
बांधकाम व्यावसायिक अनिल अग्रहारकर यांना एकाने ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून ६८ लाख रुपये घेतले. मात्र, कर्ज काही दिले नाहीत. त्याउलट घेतलेले पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनिल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद अनिल यांच्या भावाने जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून भागवत यशवंत चव्हाण (रा. प्लॉट नं. ४, शिवदत्त हौसिंग सोसायटी, एन ८, सिडको) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.
 
क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनिल अग्रहारकर यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणात मृताचे भाऊ दिलीप यांनी शुक्रवारी तक्रार दिली. या तक्रारीनुसार अनिल यांच्या डायरीमधील नोंदीनुसार ‘आरोपी भागवत चव्हाण ३० कोटी रुपयांचे लोन देणार होता. त्यासाठी आरटीजीएस आणि रोख स्वरुपात ६८ लाख रुपये त्याने घेतले. आरोपीने पैसे घेऊनही कर्ज मिळवून दिले नाही, त्यामुळे अडचणीत आलो आहे. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे,’ असे नमूद केले होते. ९ महिन्यांपासून अनिल हे बँकेतून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याचवेळी त्यांची अक्षय सलामे (रा. पैठणरोड) आणि महेश गाडेकर (रा. येवला, जि. नाशिक) यांनी भागवत चव्हाण याच्याशी ओळख करून दिली होती. चव्हाण यांनी ३० कोटी रुपये कर्ज मंजूर करून देतो, त्यासाठी ७० लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यानुसार अनिल यांनी ६८ लाख रुपये दिले होते. चार दिवसांपूर्वी भागवत चव्हाण हे अनिल यांच्या घरी आले होते. त्यांनी दुसऱ्याच दिवशी ३ कोटी रुपये रोख आणि ६ कोटी रुपये आरटीजीएसद्वारे देतो, असे स्पष्ट केले होते; परंतु त्याने ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत.